Jitendra Shelke’s Accident : खरातच्या निकटवर्तीयाचा अपघातात मृत्यू; कंटेनर चालक म्हणाला “मोठा आवाज आला अन्…”
Jitendra Shelke's Accident : कॅप्टन अशोक खरात याचा निकटवर्तीय आणि शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघातात मृत्यू झाला. ज्या कंटनेटरला त्यांची कार धडकली त्याचा चालक समोर आला असून त्याने नेमकं काय घडलं याविषयी सांगितले आहे.

Jitendra Shelke’s Accident : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना त्यांच्या कारची कंटेनरला जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे.
कॅप्टन अशोक खरात प्रकरणात शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे जितेंद्र शेळके तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. (Jitendra Shelke’s Accident )
या अपघाताच्या घटनेनंतर हा अपघात की घातपात, याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, ज्या कंटनेरला शेळके यांची कार जाऊन धडकली. त्या कंटेनरचा चालक पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. जमाल वारीस असे चालकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील अमेठीचा रहिवासी आहे.
कोपरगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात त्याने सांगितले की, हैदराबादहून अहमदाबादकडे जात असताना कंटेनरच्या रेडिएटरचा पाइप लीक झाल्यामुळे वाहन गरम होत होते. त्यामुळे तो हळूहळू गाडी चालवत होता.

Jitendra Shelke’s Accident : खरातच्या निकटवर्तीयाचा अपघातात मृत्यू; कंटेनर चालक म्हणाला “मोठा आवाज आला अन्…”
नेमकं कंटेनर चालकाने काय सांगितले?
“माझा कंटेनर थांबलेला नव्हता, तो हळूहळू पुढे सरकत होता. त्याच वेळी मागून आलेल्या कारने आमच्या कंटेनरला धडक दिली,” असे त्याने संगितले. तसेच, अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने तो खाली उतरला. मात्र काही क्षण काय झाले ते त्याला समजले नाही. पुढे जाऊन पाहिल्यावर कार कंटेनरमध्ये घुसलेली दिसल्याचेही त्याने सांगितले. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अशोक खरात याच्यावर अटकेची कारवाई झाल्यापासून शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके हे तणावात होते. खरातच्या अनेक बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांत शेळके यांचा सक्रीय सहभाग असल्याचा आरोप होत होता. आता त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा : Pramod Gaikwad : प्रशासकीय वर्तुळात खळबळ! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?





