पिंपरी | घोराडेश्वर डोंगरावर स्वच्छता अभियान

देहूरोड (वार्ताहर) – घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान, काव्या करिअर अकॅडमी, पिंपरी चिंचवड माउंटेरिंग क्लब आणि घोरवडेश्वर सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घोरवडेश्वर डोंगर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मंदिर परिसर मंदिराच्या समोरील दरी, पायरी मार्ग, पार्किंग याठिकाणचे प्लास्टिक, बॉटल, कचरा जमा करून डोंगर पायथ्याला आणण्यात आला. कचराकुंडी मंदिर परिसर पायरी मार्गावर ठिकठिकाणी कचरा कुंड्या लावण्यात आल्या. स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी बॅनरही लावण्यात आले.
तीर्थक्षेत्र घोरावडेश्वर परिसरामध्ये धार्मिक व सांप्रदायिक कामा बरोबर, निसर्ग संवर्धन, पशू, पक्षी, वन्यजीव रक्षण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रतिष्ठानचे रघुविर शेलार, तुषार तरस, मधुकर बोडके, अभिजीत भेगडे, योगेश शेलार, बाळासाहेब मराठे, हर्ष सावंत, अकॅडमीचे प्रमुख शंकर हुरसाळे, त्यांचे १५० विद्यार्थी, क्लबचे सभासद, मंडळाचे सहकारी उपस्थित होते.





