प्रभात वृत्तसेवा पाचगणी – पाचगणीच्या सिडने पॅाईंट येथे माझी वसुंधरा अभियानाअतर्गत उभारण्यात आलेले सोलर ट्री अवकाळी पावसात पडल्याबाबत संबधित ठेरेदाराला काळ्या यादीत टाकुन अनामत रक्कम जप्त करावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील यांनी संबधित कामाच्या कार्यादेशामध्ये देखभाल दुरुस्ती कालावधी शिल्लक असल्याचे कारण दाखवत संबधित ठेकेदाराला पुन्हा काम करवून घेण्याचे आदेश दिले आहेत. पाचगणी शहरातील सिडने पॅाईट येथील सोलर ट्री पावसात कोसळले होते. राजकीय दबावापोटी पंडीत पाटील यांनी ठेकेदारावर कारवाई केली नसल्याची चर्चा शहरात आहे. पाचगणी शहरात विकास कामांना आलेला निधी गुणवत्तापूर्वक कारणाकरीता वापर होतो का, हा संशोधनाचा विषय आहे. निसर्गाचे कारण दाखवत कामाची गुणवत्तेऐवजी काही पळवाटा नेहमी अधिकारी काढत असतात. तर कार्यकर्ताच ठेकेदार हा राजकीय दबाव पाचगणी शहरातील विकास कामात नेहमी पाहयला मिळत आहे. पाचगणीचा कृतीशील शाश्वत विकास गुणवत्तापूर्ण कधी होणार हा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.