भारतीय महिला पायलटला पाकिस्तानमध्ये पकडल्याचा दावा; PIBने सत्य केलं उघडं

Fact Check | जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने 7 आणि 8 मे च्या रात्री जम्मू-काश्मीर, पंजाब आणि गुजरातमधील 15 भारतीय शहरांवरील सैन्य तळांना ड्रोन आणि मिसाइल्सद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर खोटे दावे करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीचे खंडन केले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय वायुसेनेच्या पायलट शिवानी सिंह यांना पाकिस्तानने पकडले असल्याचा दावा केला आहे.
मात्र, हा दावा खोटा ठरला आहे. पीआयबी फॅक्ट चेकने भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पाकिस्तानमध्ये पकडण्यात आल्याचा दावा फेटाळून लावला आहे. पीआयबीने देशातील लोकांना या माहितीकडे दुर्लक्ष करण्याचे आणि खोटे मेसेज शेअर करू नयेत, असे आवाहन केले आहे. Fact Check |
Indian Female Air Force pilot has NOT been captured🚨
Pro-Pakistan social media handles claim that an Indian Female Air Force pilot, Squadron Leader Shivani Singh, has been captured in Pakistan.#PIBFactCheck
❌ This claim is FAKE!#IndiaFightsPropaganda@MIB_India… pic.twitter.com/V8zovpSRYk
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 10, 2025
पीआयबी फॅक्ट चेक युनिटने केलेल्या तपासणीत दावा खोटा
“पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया अकाउंट्सनी दावा केला आहे की, भारतीय हवाई दलाच्या महिला पायलट, स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंग यांना पाकिस्तानमध्ये पकडण्यात आले आहे. मात्र, पीआयबी फॅक्ट चेक युनिटने केलेल्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे,” असे पीआयबी फॅक्ट चेकने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, अशी कोणतीही घटना घडलेली नाही आणि स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंह पूर्णपणे सुरक्षित आहे. दरम्यान, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ही भारत सरकारची अधिकृत माहिती संस्था आहे, जी बनावट बातम्या तपासते आणि अचूक माहिती प्रदान करते.
हेही वाचा :
पिंपरीत बॅाम्ब शेल आढळल्याने खळबळ! परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांकडून तपास सुरू





