High Court | Divorced – पती स्वच्छ मनाने आला नसून त्याने स्वतःला अत्यंत गरीब, तसेच मंजूर केलेली मूळ पोटगीची कमी रक्कम देऊ न शकणारा माणूस असल्याचे खोटे दावे करून कोर्टाची दिशाभूल केल्याने आणि स्वतःची आर्थिक क्षमता लपवल्याने पोटगीच्या रक्कम 7 पटीने वाढण्याने आदेश उच्च न्यायालायने दिले आहेत. त्यामुळे, संबंधित पीडित पत्नीला पोटगीची रक्कम दरमहा 50 हजारांवरुन आता थेट साडेतीन लाखांवर जाऊन पोहोचली आहे. तसेच वर्षभराची थकबाकी म्हणून ४२ लाख रुपये जमा करण्याचे आदेशही विभक्त पतीला दिले आहेत. सन 1996 साली लग्न झालेल्या जोडप्याचा संसार 16 वर्षे टिकला. त्यानंतर 2013 मध्ये दोघे विभक्त झाले होते. कौटुंबीक न्यायालयाच्या निकालानंतर महिलेने एकटीने मुलीचे संगोपन करण्यास अडचणी येत असुन, तसेच पती ऐशो-आरामत जगत असल्याचा दावा पत्नीने केला होता. पोटगीच्या रक्कमते वाढ करण्यासाठी याचिका दाखल केली होती. यावेळी विभक्त पतीने पोटगी देण्याची क्षमता नसल्याचा दावा करत पोटगी रद्द करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात दाखल याचिकेवर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. 1000 कोटींचे साम्राज्य असताना दर महा 6 लाख रुपयांची मिळकत असल्याचा पतीचा दावा विभक्त पतीने न्यायालयात केला होता. मात्र, हा दावा न्यायालयात उघड झाल्याचे निरीक्षण कोर्टाने केले आहे. न्या.बी.पी कोलबावाला आणि न्या. सोमसेखर सुंदरेसन यांच्या मुंबईतील खंडपीठाने याबाबतचा निर्वाळा दिला आहे. कोविडनंतर आपले आर्थिक उत्पन्न घटल्याचा आणि आधीच पुरेशी रक्कम पत्नीला दिल्याचा दावा पतीने न्यायालयात केला होता. यावेळी, न्यायालयात पत्नीच्या बाजुने, पुरावे दाखल करण्यात आले. त्यानुसार, उच्च न्यायालयाच्या निर्णयात पतीच्या श्रीमंत जीवनशैलीचे दाखले देण्यात आले असून वाढदिवसाच्या पार्टीचे तसेच लक्झरी केंजो टी-शर्ट परिधान केलेल्या फोटोंचा तसेच परदेशी सहली आणि परदेशातील मुलाच्या शिक्षणाचा देखील निर्णयात उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या सगळ्यात काही चुकीचे नसून शपथ घेऊन खोटे सांगणे की, मी वर्षागणिक केवळ सहा लाख रुपये कमावतो हे पटत नसल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.