CJP Protest: आंदोलक संसद भवनापर्यंत पोहोचले ; पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या
CJP Protest: एनईईटी परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) या राजकीय पक्षाने केलेला विरोध आज अत्यंत तीव्र झाला आहे.

CJP Protest: एनईईटी परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून ‘कॉकरोच जनता पार्टी‘ (सीजेपी) या राजकीय पक्षाने केलेला विरोध आज अत्यंत तीव्र झाला आहे. (CJP Protest)
पक्षाने पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी मोठ्या ‘चलो संसद मार्च’ची हाक दिली आहे. CJP च्या या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि त्यांच्या पालकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यासोबतच या आंदोलनाला राजकीय नेत्यांचा देखील पाठींबा मिळताना दिसून येत आहे. (CJP Protest)
दिल्लीतील ऐतिहासिक निषेध स्थळ जंतरमंतर येथे 19 जुलैच्या संध्याकाळपासून आंदोलकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली होती, जिथे आज सकाळपर्यंत मोठा जमाव जमला होता.
#WATCH | Delhi | Security is tightened outside Parliament, in view of the Monsoon session of Parliament, which has started today, and the CJP’s proposed protest march pic.twitter.com/gZCrrY9J08
— ANI (@ANI) July 20, 2026
कडेकोट सुरक्षा व्यवस्था, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क (CJP Protest)
संसद अधिवेशनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत. नवी दिल्ली आणि संसदेच्या आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. (CJP Protest)
जंतरमंतरवर तगडा पोलीस दल तसेच निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून ठिकठिकाणी भक्कम बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
आंदोलक संसद भवनात पोहोचले (CJP Protest)
झुरळ जनता पक्षाचे आंदोलक संसद भवनात पोहोचले आहेत. येथे दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणची परिस्थिती थोडी गोंधळाची झाल्याचे पाहायला मिळत आहे.





