CJP Protest Delhi: “अभिजीत दीपकला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं” ; कॉकरोच जनता पक्षाचा मोठा दावा
CJP Protest Delhi: कॉकरोच जनता पक्षाची संसद पदयात्रा सुरूच आहे. पोलिसांनी बहुतांश ठिकाणी नाकेबंदी केली आहे.

CJP Protest Delhi: कॉकरोच जनता पक्षाची संसद पदयात्रा सुरूच आहे. पोलिसांनी बहुतांश ठिकाणी नाकेबंदी केली आहे. संसदेकडे नियोजित मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या 12,000 पेक्षा जास्त होती. आंदोलकांनी नाकाबंदी तोडण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आरएएफच्या जवानांनी लाठीचार्ज केला. दरम्यान , सीजेपीकडून अभिजित दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा मोठा दावा केला आहे.
दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके याला ताब्यात घेतल्याचा दावा जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी केला आहे. रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी तातडीने यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. शांततापूर्ण आंदोलकांवर पोलिस निर्दयीपणे वागत असून त्यांना मारहाण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. (CJP Protest Delhi)
कॉकरोच जनता पक्षाचे प्रवक्ते सौरव दास म्हणाले, “सकाळचे 11:52 वाजले आहेत. कॉकरोच जनता पक्षाच्या वतीने आशुतोष रांका आणि मी जेपी नड्डा यांना भेटणार आहोत. सरकारने सकाळी चर्चेसाठी संपर्क साधला होता. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. तरुण मोठ्या संख्येने जमले आहेत. आम्ही जिंकू.”
दरम्यान, आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.
अभिजीत दिपके यांनी आपले उपोषण संपवले (CJP Protest Delhi)
त्याच वेळी, कॉकरोच जनता पार्टी (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून सोमवारी जंतरमंतरवर आपले उपोषण संपवले.
दिल्ली पोलिसांनी शनिवारी वांगचुकला ताब्यात घेतल्यानंतर दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मंचावरून निर्णय जाहीर करताना गीतांजली अंगमो म्हणाल्या की, वांगचुक यांनी दिपके यांना संप संपवून आंदोलन सुरू ठेवण्यासाठी आपली ऊर्जा वाचवण्याची विनंती केली होती. यानंतर दीपके यांनी ज्यूस पिऊन उपोषण संपवले. वांगचुक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.



