नगर – शहरातील अवैध कत्तलखाने बंद करा

पोलीस अधीक्षकांना निवेवदन : अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
नगर – नगर शहरात वर्षानुवर्षे झेंडीगेट परिसरात अवैध कत्तलखाना सर्रासपणे सुरू आहे. अहिल्यानगर येथील सर्व संघटनांनी वेळोवेळी महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय या सर्व कार्यालयात निवेदन दिले आहेत. परंतु अद्यापही त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. त्यामुळे अवैध धंदे अहिल्यानगर व परिसरांत मोठ्या प्रमाणात सुरु आहे. येथील नागरिक धार्मिक स्वभावाची असुन या कत्तलखान्यामूळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळी शहरातील कत्तलखाने त्वरीत बंद करावे, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे. कत्तलखाने बंद न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी गोरक्षक, हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हाअध्यक्ष संजय अडोळे, विश्व हिंदू परिषदेचे गौतम कराळे, गौसेवा फाउंडेशनचे मयुर राजपुरोहित सिंग, अविनाश सरोदे, मनोज फुलारी, दिनेश हिरगुडे, पंकज नागपुरे, ऋतिक शिंदे, चांगदेव भालसिंग, अनिकेत बांगर, ओंकार गोसावी, वैभव लोखंडे, संकेत माने, आकाश फुले महाराज, वैभव बुधवंत, अमोल बारस्कर, शुभम दरेकर, सागर शेळके, निंबराज बोरुडे आदी उपस्थित होते.
शहरहद्दीतील पंचपीर चावडी येथील बागवान गल्लीतील, झेंडीगेटमध्ये अवैध कत्तलखाना, सर्जेपुरा येथील गोमांस विक्री दुकाने, सिध्दार्थनगर येथील गोमांस विक्री दुकान, चक्रधर स्वामी मंदीराच्या मागील गोमांस विक्री दुकान, भिंगार कॅम्प पो.स्टे.हद्दीतील अलमगीर परिसरातील गोमांस विक्री दुकान, भिंगार बाजार येथील गोमांस विक्री दुकान, भिंगार अर्बन बँकेसमोरील गोमांस विक्रीची दुकान, मुकुंदनगर येथे पाच गोमांस विक्रीची सुरु आहेत, अशा दुकानांवर कारवाई करावी.





