नगरचा पारा 41 अंशांवर; उकाड्याने नगरकर हैराण
Updated On:

नगर -कडाक्याच्या उन्हाळ्यात नगरकर चांगलेच होरपळून निघत आहेत. यंदाचा उन्हाळा तीव्र असेल असा हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाजही खरा ठरत आहे. दिवसाच्या तापमानात प्रचंड वाढत आहे. त्यामुळे या असह्य उकाड्याने नागरिक घामाघूम होत आहेत.
शहरात एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या जवळ आला आहे. मात्र, आता पारा 41 अंशांच्याही पुढे गेला आहे. त्याचवेळी 40 अंशाहून आधिक तापमान असणारे दिवसही वाढले आहेत. बुधवारी कमाल तापमानाने चाळीशी पार केली आहे. नगरमध्ये आज 40.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे.





