नगर : जर्सी गाय व कालवड चोरीला
Updated On:

राहुरी : अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या दरम्यान ५५ हजार रुपये किंमतीची एक जर्सी गाय व एक कालवड चोरुन नेली. राहुरी काॅलेज परिसरात ९ डिसेंबर ला ही चोरी झाली.
कृष्णा रामदास पोपळघट हे राहुरी शहरात आझाद चौक, लोहा गल्ली येथे राहत असून त्यांची शेतजमीन राहुरी काॅलेजजवळ आहे. त्यांच्याकडे दोन जर्सी जातीच्या दोन गायी असून, कृष्णा पोपळघट यांचे वडील रामदास पोपळघट हे त्यांचा चारापाणी करत असतात.
रामदास पोपळघट हे त्यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील गायींना चारापाणी करून गोठ्याचे दार बंद करुन घरी निघून आले होते.
रामदास पोपळघट हे नेहमीप्रमाणे गाईचे दुध काढणे व चारापाणी करणे करीता शेतात गेले असता त्यांना गोठ्यात गायी दिसल्या नाहीत. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.





