नगर | जिल्ह्यात सोनसाखळी करणारे जेरबंद ३ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नगर – नगर शहरासह संगमनेर व लोणी परिसरात सोनसाखळी करणारा नाशिक येथील सररायीत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून तब्बल ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ३ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
विनोद गंगाराम पवार, (वय ४०, रा. सिडको झोपडपट्टी, भगतसिंग नगर, जि.नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्याने साथीदार किशोर धोत्रे (रा. शांतीनगर, जि.नाशिक) याचे सोबत दुचाकीवर येवून जून महिन्यात संगमनेर, लोणी व अहमदनगर शहरात मंगळसुत्र चोरी केल्याची कबुली दिली. साथीदार किशोर धोत्रे याचा पोलिसांनी शोध घेतला असता मात्र तो मिळून आला नाही.
चोरी केलेले सोन्याचे मंगळसुत्र राहाता येथील सोनाराकडे विक्री केले असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याच्याकडून ३ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीस तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच आरोपी विनोद पवार हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द नाशिक जिल्ह्यात चैन स्नॅचिंग व जबरी चोरीचे एकुण ८ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेतील हेमंत थोरात, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.





