वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव, माजी उपसरपंच राजेंद्र सातव, युवा नेते चिराग राजेंद्र सातव यांच्या वतीने पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मोफत रेशन कार्ड काढून देण्याचा उपक्रम राबवण्यात आला, या उपक्रमाचा लाभ अकराशेहून अधिक लोकांनी घेतला. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राजेंद्र सातव पाटील परिवाराने हा उपक्रम राबवला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंना देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे राजेंद्र सातव यांनी सांगितले. या उपक्रमाचा शुभारंभ वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार अशोक पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाघोलीतील विविध सामाजिक संस्था राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी सरपंच वसुंधरा उबाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब सातव, माजी उपसरपंच कमलाकर सातव, प्रकाश जमदाडे, संदीप थोरात, विक्रम वाघमारे, नितीन सातव, भालचंद्र ढमढेरे, अमोल पवार, गाढवे दाजी, जयश्री काळे, अनिल सातव, चाचा जाधवराव, सुनीता सातव, वारे ताई, सचिन काळे, गणेश तांबे, अतुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.