Pimpri : वाकड परिसरात वृक्षारोपण मोहिमेस नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

हिंजवडी : रणजित आबा कलाटे फाउंडेशन व पिंपळवन वृक्षसंवर्धन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. पिंपळे निलख, जगताप डेअरी व वाकड परिसरातील मोकळ्या जागांवर शेकडो देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी रणजित कलाटे, स्नेहा कलाटे, चंद्रकांत ववले, सुनील अडसूळ, नंदकुमार भोसले, दीपक चव्हाण, सुरेश साठे, नरेंद्र बर्डे, वसंत कुलकर्णी, स्वाती कुंभार, सुवर्णा गाडे, शिवगंगा गव्हाणे, कविता टकले, अक्षय जोशी, वासंती जोशी आदी उपस्थित होते.
पर्यावरणप्रेमी विजय जगताप यांच्या संकल्पनेतून आणि आमदार शंकर जगताप यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या उपक्रमात निसर्गसंवर्धनासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व शालेय विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येक सहभागीने वृक्ष संगोपनाची जबाबदारीही स्विकारली.
या उपक्रमात दर्शना कलाटे, विजय गौरमुख, डॉ. ब्रजेश वर्षंन्येय, कीर्ती वर्षंन्येय, सुमन नायक, संगीता जैन, पवन जैन, हर्षल, अतुल, अभिषेक, अशोक, धर्मेश, प्रितेश जैन, नचिकेत कलाटे, अक्षय वाघमोडे, हर्षवर्धन मगर यांचाही सहभाग होता. शालेय विद्यार्थी यांनी खड्डे खणणे, माती-सेंद्रिय खत टाकणे अशी कामे मनापासून पार पाडली.





