पिंपरी – मुलीला फोन का केला असा जाब विचारणाऱ्या मुलीच्या वडिलांना मारहाण करत त्यांच्या घरासमोर धुडगूस घातला. ही घटना तळेगाव स्टेशन येथे घडली. चेतन डोळस, गणेश आणि पाणीपुरीवाला यांच्यासह 15 ते 20 जणांच्या टोळक्यावर तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे.
राजकुमार अनुबा चौधरी (वय 49, रा. इंद्रायणी विद्यामंदीर कॉलनी, तळेगाव-चाकण रोड) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी यांच्या मुलीला एकाने फोन केला होता. या फोनबाबत चौधरी यांनी जाब विचारला. त्यामुळे आरोपींनी चौधरी यांच्या दोन मुलांना इंद्रायणी कॉलेजजवळ दमदाटी केली. तसेच 15 ते 20 जणांच्या टोळक्यासह चौधरी यांच्या घरासमोर येऊन दमदाटी व धक्काबुक्की केली आणि दोन्ही मुलांना जिवे मारू, अशी धमकी देऊन पसार झाले. तळेगाव – दाभाडे पोलीस तपास करत आहेत.