मुंबई – छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी’. या मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली होती.
दरम्यान, या मालिकेतील दया आता लवकरच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. आगामी ‘गरम किटली’ या मराठी चित्रपटात दया एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सीआयडी’ या मालिकेत अभिनेता म्हणून दयानंद शेट्टी याने ‘दया’ची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
“दया दरवाजा तोड़ दो…’ हा डायलॉग आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय. आणि त्याची हीच स्टाईल प्रेक्षकांना भावली. यापूर्वी दया अभिनेता ‘अजय देवगण’च्या सिंघम रिटर्न्स चित्रपटात देखील झळकला होता. मात्र, आता तो मराठी मराठीत पदार्पण करत आहे.
त्यामुळे दयाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ‘गरम किटली’ चित्रपटात दया सोबत ‘विजय पाटकर, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, विशाखा सुभेदार, मनीषा पैठणकर, विराज गोडकर, पल्लवी पाटील’ यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत.