CID Serial : लोकप्रिय CID मालिका आता मराठीमध्ये येणार; सोनी मराठी वाहिनीकडून प्रोमो शेअर

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सीआयडी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेने तब्बल 20 वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत, डॉ. साळुंखे, डॉ.तारिका, फ्रेडरिक, पूर्वी श्रेया, सचिन, निखिल या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली होती.
View this post on Instagram
90 व्या दशकातील ही गाजलेली मालिका आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्जा झालीये. नुकतच सोनी मराठी वाहिनीवर प्रोमो शेअर करण्यात आला आहे. अभिजीत, दया आणि एसीपी प्रद्युम्न हे पुन्हा एकदा सत्याचा शोध घेण्यासाठी येणार आहेत. या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स त्यांची उत्सुकता व्यक्त केली आहे.
कुछ तो गडबड हैं, दया तोड दो दरवाजा असे अनेक डॉयलॉग आता प्रेक्षकांना मराठी ऐकायला मिळणार आहेत. सीआयडी या क्राईम मालिकेचा पहिला भाग 21 जानेवारी 1998 रोजी प्रसारित झाला होता. तर 2018 मध्ये 1 हजार 547 भाग प्रसारित झाल्यानंतर मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेने जवळजवळ 20 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होते.





