Dabangg 4 Update : चुलबुल पांडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! सलमानने दबंग 4 बाबत दिली मोठी हिंट

Dabangg 4 Update : भाईजान सलमान खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतात. २०१० मध्ये सलमानच्या दबंग या चित्रपटाचे मोठं कौतुक करण्यात आले होते. हा चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर मोठी कमाई केली होती. या चित्रपटात सलमान खानने साकारलेला पोलीस अधिकारी चुलबुल पांडे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.
दबंगवरचे प्रेक्षकांचे प्रेम पाहता चित्रपटकर्त्यांनी दबंग २ आणि दबंग ३ हे चित्रपट तयार केले. आता दबंगच्या नव्या भागाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला दबंग ४ येणार असल्याची हिंट स्वतः सलमान खानने एका कार्यक्रमात दिली आहे. १६ जुलै या दिवशी इंडियन सुपरक्रास रेसिंग लीग सिजन २ च्या लॅान्च इव्हेंटमध्ये सलमान खानने हजेरी लावली होती. या कार्यक्रमातून त्याने एक कृती केली यामधून त्याने त्याच्या आगामी दबंग ४ बाबत हिंट दिली आहे.
सलमान स्टेजवरती आल्यानंतर त्याच्या डोळ्यावरचा काळा चष्मा आणि अंगावरच टी शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला आलेल्या लोकांशी बोलताना त्याने मध्येच डोळ्यांवरचा चष्मा काढला… फोल्ड केला… एकडे तिकडे पाहिले…. समोरच्या एका व्यक्तीला वाटले की तो चष्मा कुठेतरी त्याला ठेवण्याचासाठी तो तसे करतोय…
पण मूळात असे काही नव्हते. तर सलमानने त्याच्या मागच्या खिशात चष्मा टाकला. त्याच्या या कृतीने सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेतले. यावेळी भाईजानने थेट हे दबंग ४ साठी होते, असे म्हणत दबंग लवकरच भेटीला येणार असल्याची मोठी अपडेट दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज खान दबंग ४ वर काम करत आहेत. मात्र, चित्रपटाच्या कथेला घेऊन दोघांची मतं वेगळी आहेत. ज्यादिवशी चित्रपटाच्या कथेवर दोघांचेही एकमत होईल त्यावेळी दबंग ४ च्या शुटिंगला सुरूवात केली जाणार आहे.





