“चित्रा वाघ, राम कदमला बांगड्या भरण्याचं काय झालं??”

Updated On:

पुणे : परळीतील मुंडे बंधू भगिनींचे राजकारण चांगलेच तापले असून, यामध्ये आता इतर नेत्यांनीही उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंढेंच्या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्र वाघ यांनी धनंजय यांच्यावर निशाणा साधत ” धनूभाऊ तुम्ही चुकलात अशी टीका केलीये. तर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“भाजपात गेला म्हणून त्यांचा उदोउदो करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला काही माहिती नसताना तुम्ही कशाला बोलताय”, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.

त्याच बरोबर राम कदमला बांगड्या भरण्याचं काय झालं??’ असा प्रश्न चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे. भाजप सेनेच्या मंञ्यांची बलात्काराची प्रकरणं बरीच आहेत. जमलं तर तेवढं विचारा. आणि राम कदमच्या बांगड्याचं काय झालं, ते पण बघा, असं म्हणत चाकणकर यांनी एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांचं वक्तव्य अतिशय धक्कादायक होतं. मनाला अतिशय वेदना देणारं होतं. निवडणूक येते आणि जाते. हार आणि जीत ही तर चालू असते. परंतू बहीण आणि भावाचं पवित्र नातं. त्या नात्याची किंमत सुद्धा राहिली नाही. ‘धनुभाऊ तुम्ही चुकलात!’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. आता रूपाली चाकणकर यांच्या टीकेला चित्रा वाघ काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rupali Chakankar : ‘सर्वात आधी नानांचाच फोन आला'; रुपाली चाकणकरांनी सांगितली आठवण, भावुक पोस्ट केली शेअर

2026-10-08 11:03:31

Rupali Chakankar : ‘सर्वात आधी नानांचाच फोन आला'; रुपाली चाकणकरांनी सांगितली आठवण, भावुक पोस्ट केली शेअर

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता