चिटफंड घोटाळा : राजीव कुमार यांच्या कस्टडीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

नवी दिल्ली – चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या सीबीआयला, सर्वोच्च न्यायालयाने खात्रीलायक पुरावे सादर करण्याचे निर्देश होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज सीबीआयच्या विनंतीवर आपला निकाल राखून ठेवला आहे.

शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणातील सबूत नष्ट करण्यात राजीव कुमार यांच्या कथित भूमिकेबद्दल माजी कोलकाता पोलिस आयुक्त, राजीव कुमार यांना ताब्यात घेण्याची परवानगी सीबीआयने मागितली होती. याप्रकरणी सीबीआयला सर्वोच्च न्यायालयाने खात्रीलायक पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते.

यापूर्वी, कोलकाता शहर पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देत न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना धक्‍का दिला होता. पण त्याचवेळी त्यांना अटक करता येणार नाही, असे सांगत दिलासाही दिला होता.

चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांनाच तेथील पोलिसांनी पोलीस ठाण्यात घेवून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पश्‍चिम बंगाल सरकार आणि सीबीआयमधील वादावर सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार यांना अटकेपासून संरक्षण दिले होते.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.