सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावर चिरंजीवी संतापला…

Chiranjeevi Viral Video । चाहत्यासोबत सेल्फी न घेतल्यामुळे साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. विमानतळावरील चिरंजीवीचा व्हिडिओवर बरीच टीका होत आहे. त्याच्यासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चाहत्याला धक्काबुक्की केल्याबद्दल या अभिनेत्याला सोशल मीडियावर खूप टीकेला सामोरे जावे लागत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा विमानतळाच्या लिफ्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान जेव्हा इंडिगो एअरलाइन्सचा कर्मचारी चिरंजीवीला सेल्फीची विनंती करतो, तेव्हा त्यावेळी त्याला जोरात ढकलले जाते. या घटनेवर लोकांच्या सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. चिरंजीवीवर अनेकजण संतापले आहे.
Chiranjeevi Rude Behaviour with Fans Airport @KChiruTweets
— Kill Bill Pandey (@kill_billpanday) July 30, 2024
तर मेगास्टारच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला. एका चाहत्याने लिहिले,’हे असभ्य वाटते परंतु लोकांकडे त्यांना एकट्याने वेळ देण्यासाठी पुरेशी समज नाही. किमान त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यापूर्वी विचारले पाहिजे. कुणास ठाऊक, कदाचित तो घाईत होता किंवा कदाचित तो निराश झाला होता म्हणून त्याला फक्त निघून जायचे होते’ तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. या टीकेवर मात्र चिरंजीवीने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
दरम्यान, पॅरिसमध्ये ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला हा मेगास्टार त्याच्या कुटुंबासह उपस्थित होता. नुकतेच त्याने ऑलिम्पिक मशाल हातात धरून फोटो काढलेला शेअर केला आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पत्नीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
चिरंजीवीच्या वर्क फ्रंट बाबत बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘विश्वंभरा’मध्ये दिसणार आहे. 2025 मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चिरंजीवीने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 132 चित्रपटांमध्ये काम केले आहे.





