धक्कादायक ! चिपळूणमध्ये कॉलेजची संरक्षक भिंत कोसळून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

चिपळूण : सध्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले आहे. कोकणात तर पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे चिपळूणमध्ये डीबीजे कॉलेजची संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत भिंतीखाली गाडला गेल्याने एका विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे. हा घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर सगळीकडे त्याची शोधाशोध सुरु झाली. यानंतर भिंतीच्या ढिगार्याखाली या विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला. सुशांत घाणेकर असे मृत तरुणाचे नाव आहे. खेडमधील रहिवासी असलेला सुशांत घाणेकर चिपळूणमध्ये डीबीजे महाविद्यालयात शिक्षण घेत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर चिपळूणमध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. या यंत्रणेमध्ये ज्यांचा दोष असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच यामध्ये जर हायवे प्रशासनाचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.





