फ्लाइंग कारची चर्चा जगात खूप दिवसांपासून सुरू आहे. पण आता लोकांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. चीनी ऑटोमेकर इलेक्ट्रॉनिक एक्सपेंग इंक.(Electronic Xpeng Inc.) ने फ्लाइंग कार बनवली आहे. ही कार लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवेल. या कारने प्रथमच दुबईत उड्डाण केले आहे. ही उडणारी कार अप्रतिम दिसते.
इलेक्ट्रॉनिक एक्सपेंग इंक. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर आपल्या खास वैशिष्ट्याबद्दल सांगितले आहे. वेबसाईटनुसार, X2 ही इलेक्ट्रिक वर्टिकल टेक-ऑफ आणि दोन सीट असलेली लँडिंग कार आहे. ही कार आठ प्रोपेलरद्वारे हवेत उचलले जाते. कंपनीला दुबई नागरी उड्डाण प्राधिकरणाने (DCAA) विशेष उड्डाण परवाना दिला होता. यानंतर XPENG X2 ने प्रथमच सार्वजनिक उड्डाण केले. यावेळी जागतिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह 150 हून अधिक लोक उपस्थित होते.
अत्यंत सुंदर उडणारी X2 कार चाचणी उड्डाणदरम्यान सुमारे 90 मिनिटे आकाशात उडाली. याचे टिअरड्रॉप आकाराचे डिझाइन आणि उड्डाणातील कामगिरी पाहून उपस्थित थक्क झाले. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, कारचे वजन कमी करण्यासाठी XPENG X2 पूर्णपणे कार्बन फायबरपासून बनवण्यात आले आहे.
XPENG X2 कारमध्ये दोन आसने असतील आणि उड्डाण दरम्यान शून्य कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करेल. XPENG X2 मधील दोन ड्रायव्हिंग मोड मॅन्युअल आणि ऑटोनॉमस आहेत. ही कार फक्त एका बटणाने सुरू करता येते. ऑटोनॉमस प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही काळजी न करता टेक ऑफ आणि लँडिंग करता येईल, असा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की या वर्षीच्या 1024 XPENG टेक डेला सहाव्या पिढीतील फ्लाइंग कारची प्रगत आवृत्ती रिलीज होईल. ही कार टेक ऑफ होताच रस्त्यावरदेखील धावण्यास सक्षम असेल, परंतु X2 कार फक्त उडू शकते. कंपनीने सांगितले आहे की, नवीन व्हर्जनमुळे लोक जेव्हा हवे तेव्हा झेप घेऊ शकतात आणि आकाशात उडू शकतात. इंटेलिजेंट ड्रायव्हिंग मोडच्या मदतीने ही कार उडवताही येते आणि उतरवताही येते.
फ्लाइंग कार निर्मात्या कंपनीने आतापर्यंत अभियांत्रिकीसाठी इलेक्ट्रॉनिक Xpeng इंक रेड डॉट पुरस्कार, IF पुरस्कार आणि IDEA डिझाइन पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.