पिंपरी – जिल्ह्यात सर्वाधिक 12 हजार 101 दिव्यांग मतदार चिंचवड विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी म्हणजेच 1 हजार 689 दिव्यांग मतदार मावळ मतदार संघात आहेत, दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदार संघात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. जिल्ह्यात 21 विधानसभा मतदार संघात मिळून 90 हजार 134 दिव्यांग मतदार आहेत. यात अस्थिव्यंग, कर्णबधिर, अल्पदृष्टी आणि इतर प्रकारच्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जुन्नर मतदार संघात 1 हजार 917, आंबेगाव 2 हजार 776, खेड- आळंदी 3 हजार 612, शिरुर 3 हजार 986, दौंड 3 हजार 180, इंदापूर 2 हजार 12, बारामती 4 हजार 980, पुरंदर 4 हजार 313, भोर 6 हजार 80, मावळ 1 हजार 689, चिंचवड 12 हजार 101, पिंपरी 4 हजार 251, भोसरी 7 हजार 143, वडगाव शेरी 3 हजार 537, शिवाजीनगर 2 हजार 216, कोथरुड 2 हजार 814, खडकवासला 3 हजार 439, पर्वती 3 हजार 440, हडपसर 7 हजार 615, पुणे कॅन्टोन्मेंट 5 हजार 100 तर कसबा पेठ मतदार संघात 4 हजार 868 इतके दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर रॅम्पची सुविधा, पुरेशा संख्येने व्हील चेअर्स, वाहन व्यवस्था, स्वतंत्र रांगा, ब्रेल लिपीतील साहित्य, कर्णबधिर दिव्यांगांसाठी दुभाषक, सहायक, प्रतिक्षालय, फॉर्म 12 ड भरुन घरातूनच मतदानाची सोय, 9226363002 हा हेल्पलाईन क्रमांक आदी सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ‘सक्षम’ पच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांच्या मागणीप्रमाणे मतदारसंघनिहाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहितीही निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. मतदार संघ दिव्यांग मतदार संख्या मावळ 1 हजार 689 चिंचवड 12 हजार 101 पिंपरी 4 हजार 251 भोसरी 7 हजार 143 एकूण – 25 हजार 184