कोरोनाच्या बळींची संख्या 425
Updated On:

बिजिंग : कोरोना विषाणूंच्या बाधेमुळे चिनमधील मृतांची संख्या 425 वर पोहोचली आहे. हुबेई प्रांतात मंगळवारी 64 जण मरण पावले, अशी माहिती चिनच्या आरोग्य खात्याने पत्रकाद्वारे दिली आहे.
चिनमध्ये 20 हजार 400 जणांना बाधा झाली असून विषाणूंचा प्रसार वेगाने वाढत आहे. एका दिवसांत तीन हजार 235 जणांना बाधा झाली आहे, अशी माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.
चीनच्या मुख्यभूमीशिवाय कोरोनाचा दुसरा बळी हॉंगकॉंगमध्ये नोंदवण्यात आला. 39 वर्षीय तरूणाचे कोरोनामुळे निधन झाले. चीनमध्ये कोरोनाच्या बाधा झालेल्या अन्य दोन शहरात जाण्यास प्रवेशबंदी जारी करण्यात आली आहे.
फिलीपाईन्समध्ये सोमवारी एका तरूणाचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती वुहानहून आली होती, असे सांगण्यात आले.





