China Open 2024 : अल्काराजनं पटकावलं जेतेपद, गतविजेत्या सिनरला चारली पराभवाची धूळ…

China Open 2024 (Carlos Alcaraz vs Jannik Sinner) : स्पेनच्या कार्लोस अल्काराझने बुधवारी चमकदार कामगिरी करत प्रथमच चायना ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 2024 मधील अल्काराजची ही चौथी टूर-स्तरीय ट्रॉफी आहे. 21 वर्षीय स्पॅनिश खेळाडू अल्काराजने अंतिम फेरीत गतविजेत्या आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या जॅनिक सिनरचा तीन तास 21 मिनिटे चाललेल्या लढतीत 6-7, 6-4, 7-6 असा पराभव केला.
तिसऱ्या मानांकित अल्काराझने यंदाच्या गतविजेत्या सिनरविरुद्धचे तिन्ही महत्वाचे सामने जिंकले आहेत. यासह त्याला सिनसिनाटी आणि यूएस ओपननंतर सलग तिसरे विजेतेपद मिळवण्यापासून रोखले आहे. याशिवाय कार्लोस अल्काराझने इटालियन जेनिक सिनरची 14 सामन्यांची विजयी मालिकाही खंडित केली आहे.
BEIJING CHAMPION 🏆
In a breathtaking final, @carlosalcaraz fights back to defeat the defending champion Sinner 6-7(6) 6-4 7-6(3) for the #ChinaOpen title!@chinaopen pic.twitter.com/idvMd6LRiz
— ATP Tour (@atptour) October 2, 2024
सिनरसाठी सामन्यावर लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण होते कारण शनिवारीच जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) सांगितले होते की, डोपिंग प्रकरणात त्याला क्लीन चिट देण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील करणार आहे. त्याच्यावर एक-दोन वर्षांसाठी बंदी घालण्याची मागणी वाडाने केली आहे. सिनरला मार्चमध्ये दोनदा प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते, परंतु ऑगस्टमध्ये स्वतंत्र न्यायाधिकरणाने त्याला क्लीन चिट दिली होती.
तत्पूर्वी, अल्काराझने मंगळवारी बीजिंग येथे रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा 7-5, 6-3 असा (Carlos Alcaraz beat Daniil Medvedev) सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत यानिक सिनर याने वाईल्ड कार्डधारक चीनचा बु युनचाओकेट 6-3, 7-6(3) असा (Jannik Sinner defeated Yunchaokete Bu) पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.





