नवी दिल्ली – भारत व अमेरिकेसारखे देश निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करुनही त्यांची व्यापारातील तूट वाढत असताना चीनने मात्र जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत निर्यात वाढवून आयात कमी करण्यात यश मिळविले आहे. या कालावधीत चीनची आयातीपेक्षा निर्यात तब्बल एक लाख कोटी डॉलरने जास्त आहे. गेल्या पूर्ण वर्षात चीनची आयातीपेक्षा निर्यात 992 अब्ज डॉलरने जास्त होती. आता हा टप्पा चिन्हे 11 महिन्यातच ओलांडला आहे. त्यामुळे परकीय व्यापार क्षेत्रात चीन यावर्षी नवा विक्रमी करणार आहे. चीनची अमेरिकेला होणारे निर्यात बरीच कमी झाली असली तरी याच कालावधीत चीनने पर्यायी बाजारपेठात आपल्या वस्तू पाठवून व्यापार वाढविण्यात यश मिळविले आहे. 11 महिन्यात चीनची निर्यात 5.9% वाढली आहे. ही निर्यात बाजार विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त आहे. चीनने वस्तूचे दर कमी करून हे निर्यात इतर देशांना वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे भारतही चीनकडून होणारी आयात रोखण्यासाठी प्रयत्न करत असूनहीही आयात मात्र वाढत असल्याचे चित्र आहे.