चिंबळी : वॉटर सप्लायर करणाऱ्या दोन ट्रान्स्फरीची चोरी; पिण्याच्या पाण्याची व शेतीचे नुकसान
Updated On:

चिंबळी – मरकळ ता. खेड येथील पाटील वस्ती रस्त्यावरील गेल्या २२ जानेवारी रोजी दोन ट्रान्स्फर चोरी झाल्याची घटना घडली. यामुळे या परिसरात पिण्याच्या पाण्याचे व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपूर्वी जुना वॉटर सप्लायर करणारा ६३ एच पीचा ट्रान्स्फर बसविण्यात आला होता.
परंतु तो ही ट्रान्स्फर ३१ रोजी पुन्हा चोरीला गेला असल्याने मरकळ पाटील वस्ती येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व शेती पिकांचे नुकसान होणार असल्याचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण लोखंडे यांनी सांगितले आहे. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या चोरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या परिसरात वारंवार ट्रान्स्फर व केबल चोरीच्या घटना घडत आहेत.





