तळेगाव ढमढेरेत बालचमूंची वृक्षदिंडी

Updated On:

तळेगाव ढमढेरे (वार्ताहर) – येथील जिल्हा परिषद शाळेतील लहान मुली व मुलांची पुस्तक आणि वृक्षदिंडी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून रामकृष्ण हरी, ज्ञानदेव तुकाराम अशा प्रकारच्या नामगजरात संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. यामुळे येथील वातावरण भक्तिमय झाले होते.

कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा प्राथमिक शाळा क्र.१ व २ मधून आज सकाळी ८ वाजता बालवारकऱ्यांची दिंडी संपूर्ण गावात प्रभातफेरी काढत निघाली. या दिंडीत मुलांनी वारकऱ्यांची वेशभूषा करत गावातील ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. हातात टाळ-मृदुंग घेऊन हरिनामाचा जयघोष करीत ही दिंडी निघाली. शाळेतील शेकडो मुली आणि मुलांनी दिंडीत भाग घेतला होता. सकाळपासून पावसाच्या सरी ओसंडत असताना रस्ता चिखलमय झाला असताना अस्सल वारीचा अनुभव या बाल वारकऱ्यांनी घेतला.

आणखी संबंधित बातम्या

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

2026-09-29 06:45:13

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

2026-09-29 05:30:30

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

2026-09-13 05:30:19

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा

2026-08-09 05:15:33

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा

PMC Budget: अर्थसंकल्प बनविण्यात आता तुमचाही सहभाग! महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत मागवल्या सूचना...वाचा सविस्तर

2026-08-07 06:30:49

PMC Budget: अर्थसंकल्प बनविण्यात आता तुमचाही सहभाग! महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत मागवल्या सूचना...वाचा सविस्तर