Pune District : जवळे झेडपी शाळेत मुलांचा दिंडी सोहळा
Pune District : कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या शिक्षक व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, सांस्कृतिक मूल्ये आणि सामाजिक ऐक्याचा संदेश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यातील जवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुलांनी वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. हातात टाळ, गळ्यात मृदुंग आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग घेतला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. वैभव महाराज शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि वारकरी परंपरेबद्दल आदर निर्माण होतो.
यावेळी माजी सरपंच हरिचंद्र शिंदे, पंढरी टाव्हरे, बबन बोराटे, अवी वाळुंज, सचिन गावडे, दत्ता गायकवाड, राजाराम शिंदे, विवेक लायगुडे, विलास महाराज, निरंजन शिंदे, किसन लोखंडे, संजय निघोट, उपसरपंच मनीषा टाव्हरे, कविता शिंदे, सोनल शिंदे, प्रतीक्षा शिंदे, नयन खालकर, प्रियांका एलभोर, सुरेखा खालकर, शैला गावडे, पुष्पा इंदोर, संध्या वाळुंज, वैशाली वायकर, सविता तांबे, अर्चना लोखंडे यांच्यासह महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या शिक्षक व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, सांस्कृतिक मूल्ये आणि सामाजिक ऐक्याचा संदेश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशी माहिती शाळेचे माजी अध्यक्ष उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.





