राजगुरूनगर – येथे पल्स पोलिओ साठी मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी पासून 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओचा डोस पाजण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. देशात आज सर्वत्र पल्स पोलिओ मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. जास्तीत जास्त बालकांना पोलिओचा डोस देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जागृती करण्यात आली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रचार प्रसार करण्यात आला होता. यावेळी या मोहिमेला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला त्यांच्या 0 ते 5 वयोगातील पाल्याला आज जवळच्या केंद्रावर नेवून पोलिओ डोस दिला.
राजगुरूनगर येथील केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. येथील केंद्रावर जिल्हा आरोग्य प्रशिक्षण संस्था औंधच्या डॉ. गौरी जाधव यांच्या हस्ते येथील लहान बालकाला पोलिओचा डोस पाजण्यात आला.
यावेळी डॉ. उदय पवार, डॉ. अतुल मेहेत्रे, डॉ. सुशील पांडे, आरोग्य पर्यवेक्षक नर्मदा रासकर, ज्योती मोडक, सदानंद मोहिते, सतीश मोरे, सुनील सुलाखे, योगेश रसाळ, भूषण भारती, निलेश सोनवणे, सतीश काळदंडे, संदीप गाढवे, अतिष काळबांडे, अलका लांडगे, सुनीता माळी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.