satara | माजी सैनिका पाल्यांनी शैक्षणिक आर्थिक मदतीचे अर्ज पडताळणी करावी
Updated On:

सातारा, (प्रतिनिधी) – माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेमार्फत शैक्षणिक मदत योजनेअंतर्गत अर्ज अपलोड करण्याची वेबसाईट दि. १२ जून २०२४ ते २१ जुलै २०२४ पर्यंत काही तांत्रिक अडचणीसाठी केंद्रिय सैनिक बोर्डातर्फे बंद ठेवण्यात आली आहे.
ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी १२ जून २०२४ च्या अगोदर अर्ज अपलोड केला असेल त्यांनी आपल्या अर्जाची पडताळणी,
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांचे मार्फत करून कार्यवाही पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आनंद पाथरकर यांनी केले आहे.





