स्वप्नील जोशीच्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा मजेशीर टीझर आला समोर, ‘या’ तारखेला रिलीज होणार सिनेमा

Chiki Chiki BooBoom Boom Movie: स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटाचा मजेशीर टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. तेव्हापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या नावामुळे याची विशेष चर्चा रंगली आहे.
शाळा-कॉलेजमधील बॅकबेंचर्स मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र भेटल्यानंतर कशाप्रकारे धमाल करतात व त्यानंतर काय काय घडते, याची झलक या टीझरमधून दाखवण्यात आली आहे. ‘इकडे आड तिकडे विहीर’, ‘आगीतून फुफाट्यात’, ‘धरलं तर चावतंय सोडलं; तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींतून या बॅकबेंचर्सची ओळख करून देण्यात आली आहे. चित्रपटाच्या या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
View this post on Instagram
28 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर रिलीज होणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रभाकर मोरे या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. याशिवाय, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, चेतना भट, ,निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे हे कलाकारही या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.
‘चिकी चिकी बुबूम बुम’चे दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांनी केले आहे. तर सुनील नारकर हे निर्माते व दिपक पेंटर आणि प्रसाद खांडेकर हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांनी केले आहे.





