आमचा रंग आजही भगवाच; मुख्यमंत्र्याचा राज ठाकरेंना टोला

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी अपत्यक्षरित्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली. ना आमचा रंग बदला ना आमचे अंतरंग बदले, आमचे अंतरंग आजही भगवे आहेत, आणि रंगही भगवा आहे असा टोला त्यांनी राज यांना लगावला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती यानिमित्त बीकेसी येथे शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
त्यांनी भाजपवर देखील टीका केली. मुखयमंत्री म्हणाले कि, २०१४ साली तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन केले. युती तर तुम्ही २०१४ लाच तोडली होती आणि आज शिवसेनेला नावे ठेवता. हि वचनपूर्ती नाही परंतु वाचनपूर्तीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. मला भाजपने खोटं पडण्याचा प्रयत्न केला. प्राण गेला तरी चालेले मी जनतेशी खोटे बोलणार नाही.
भाजपने दिलेले वाचन पळाले नाही म्हणून मला हा मार्ग निवडावा लागला. मी बाळासाहेबांना दिलेले वाचन पाळले, मी पाळणारा नाही तर लढणारा आहे अशा कडक शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवसैनिक माझे सुरक्षा कवच आहे.
हा तुमचा सत्कार आहे. ज्या शिवसैनिकांनी शिवसेना वाढवली, रक्त सांडले शिवसेनेसाठी प्राण दिले, अशा शिवसैनिकांना हा सत्कार समर्पित असल्याचे ते म्हणाले.प्राण गेला तरी चालेल मी तुमच्याशी खोटे बोलणार नाही. आम्ही मैदान उतरायला कधीही घाबरत नाही.
मी लढाईला घाबरत नाही. मला फक्त तुमची साथ हवी आहे. तुम्ही दाखवलेले प्रेम, विश्वास याबद्दल मी तुमचा कायम ऋणी राहील अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. मी बाळासाहेबांना शब्द दिला होता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल म्हणून. पण मी मुख्यमंत्री होईन असा शब्द बाळासाहेबांना कधीच दिला नव्हता. आज मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली आहे.
जेष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, आदी मंत्री कार्यकर्ते उपस्थित होते.





