नवी दिल्ली – मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
Chief Minister of Manipur, N Biren Singh tests positive for COVID19 pic.twitter.com/p1bDYJoQUo
— ANI (@ANI) November 15, 2020
मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, “मला कोरोनाची लागण लागण झाली आहे. अलीकडेच माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ची कोरोना तपासणी करुन घ्यावी आणि स्वत:ला आयसोलेट करावे”.