मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडीओ एडिट करून व्हायरल करणं पडलं महागात; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

Devendra Fadnavis Edited Video | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र त्यांचा व्हिडिओ एडिट करून ते संविधान विरोधात असल्याचं दाखवण्यात आला होता. या व्हायरल व्हिडिओची सायबर पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी १२ जणांवर व त्यांच्या सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा करण्यात आला आहे.
12 जणांवर गुन्हा दाखल
शुद्धोधन सहजराव, नागपूर काँग्रेस सेवादल, भारत शिंदे, सौरभ सिंह चौहान, मुकेश लवाळे, प्रसाद साळवी, सुरेश काळे, वरद कांकी, अमोल कांबळे, सैयद सलीम, द स्मार्ट २३०के, विष्णू भोटकर अशा व्यक्ती आणि सोशल मीडिया हँडलविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक या चित्रफिती अपलोड करण्यात आल्याचा आरोप आहे. Devendra Fadnavis Edited Video |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ हा अर्धवट एडिट करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. याप्रकरणी आणखी काही जणांचा शोध घेतला जात आहे. तसेच तांत्रिक विश्लेषण करून ट्विटर, फेसबूक व इन्स्टाग्राम व यूट्यूबला देखील या व्हायरल व्हिडिओची माहिती देऊन तो काढून टाकण्याचे सांगण्यात आले आहे. Devendra Fadnavis Edited Video |
अमित शाह यांच्या विधानाविरोधात काँग्रेसकडून आंदोलन
दरम्यान, यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाविरोधात काँग्रेसनं अनेक ठिकाणी निषेध मोर्चे व आंदोलनं केली. यावरून भाजप अडचणीत सापडली असतांना आता सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे भाजप समोर अडचणी निर्माण होत आहेत.
हेही वाचा:
फिल्टरपाड्याचा गौरव आता हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवणार, सिनेमाचे पोस्टर आले समोर





