खालापूर – कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 7 जानेवारीला होणार आहे. कर्जतच्या पोलीस ग्राऊंडवर ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या सभेची जोरदार तयारी केली आहे. सभेच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहरात प्रती आळंदी, निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, शिवसृष्टी, प्रशासकीय भवन यासह केलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 7 जानेवारीला होणार असून कर्जतच्या पोलीस ग्राऊंडवर दुपारी 4 वाजता मुख्यमत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आदि मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जतमध्ये पहिल्यांदाच येत असल्यानेथोरवे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे.