मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका, दौरे रद्द; डाॅक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
Updated On:

मुंबई – सततचे दौरे आणि बैठकांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत बिघडली असल्याने त्यांचे आजचे (दि. 4) सर्व दौरे आणि प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. थकवा आल्याने डाॅक्टरांकडून त्यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून मुख्यमंत्री शिंदे सतत दौऱ्यावर होते. त्यांनी नाशिक, पुणेचा दौराही केला. यावेळी त्यांनी दिवसभरात दोन, तीन ठिकाणी सभा घेतल्या. त्यामुळे त्यांची तब्बेत खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटणार आहेत.





