Satara | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यात हेलिपॅडवर स्वागत
Updated On:

सातारा, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे येथील सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर आगमन झाले. त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
यावेळी पोलिसांच्या तुकडीने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सलामी देवून मानवंदना दिली. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. महेश शिंदे, आ. जयकुमार गोरे,
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आदी उपस्थित होते.





