Thane Election Results 2024 | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज शनिवार 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. आज आठ वाजता एकाचवेळी मतांची मोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नुकतेच पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाण्याच्या कोपरी पाचपाखडी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. केदार दीघे पिछाडीवर आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखली जात होती. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट)ने कोपरी- पाचपखाडी मतदार संघातुन आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी- पाचपखाडी मतदार संघातुन तीनदा निवडून आले असून ते यंदाही याच मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा सामना रंगला आहे. सध्या समोर आलेल्या पहिली फेरीत कोपरी पाचपाखाडीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांना आतापर्यंत ५४७७ मतं मिळाली आहेत. तर केदार दिघे १४२४ आणि मनोज शिंदे १३ पहिल्या फेरीत मतांवर आहेत. – कोपरी पाचपाखाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ हजार मतांनी आघाडीवर