चिंदबरम यांनी उडवली तृणमूलच्या घोषणेची खिल्ली
Updated On:

पणजी – तृणमूल कॉंग्रेसने गोव्यातील महिलांना दरमहा पाच हजार रुपयांची थेट मदत देण्याची घोषणा केली आहे. त्या घोषणेची कॉंग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. त्यांनी ईश्वर गोव्याला वाचवो अशी प्रार्थनाही केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, गोव्यातील साडे तीन लाख कुटुंबातील महिलांना दरमहा पाच हजार रूपये द्यायचे तर दर महिन्याला 175 कोटी रूपये खर्च होतील. वर्षाला ही रक्कम 2100 कोटी रूपये इतकी होते.
गोव्यावर सध्या एकूण 23 हजार 473 कोटी रूपयांचे कर्ज आहे, आता ईश्वरच गोव्याला वाचवेल अशी टिपण्णी चिदंबरम यांनी केली आहे. सध्या गोव्यात तृणमुल कॉंग्रेस, आम आदमी पक्ष, भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात मतदारांच्या आश्वासनांची स्पर्धा लागली आहे.





