चीन-अमेरिकेचे एकमेकांवर हॅकिंगचे आरोप प्रत्यारोप

बीजिंग – मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज ईमेल सिस्टीम हॅक केल्याचा अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी केलेला आरोप चीनने आज फेटाळून लावला. उलट अमेरिकाकडूनच चीनच्या संस्थांबाबत सायबर हॅकिंग केले जात असल्याचा आरोप चीनने केला आहे.
चीनच्या चार नागरिकांवर अमेरिकेने हॅकिंगचे आरोप केले होते. या चार जणांनी मिळून अमोरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाबरोबर संगनमत करून अमेरिकेची व्यापार, तंत्रज्ञान आणि रोगांबाबतच्या संशोधनाची गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न केला असा आरोप अमेरिकाने केला आहे.
हे हॅकर चीन सरकारशी संबंधित असल्याची अधिकृत घोषणा बायडेन प्रशासन आणि युरोपातील देशांनी केल्यावर चीनने या आरोपांचे खंडन केले आहे. चीनवर अशाप्रकारचे आरोप पूर्वीपासूनच केले जात होते. मात्र त्यासंदर्भात चीनवर निर्बंध घातले गेले नव्हते.
अमेरिका आपल्या मित्र देशांबरोबर मिळून चीनच्या सायबर सिक्युरिटीवर अनावश्यक आरोप करत आहो, असे चीनचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी म्हटले आहे. हे आरोप दिशाभूल करणारे, बेछुट आणि पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. चीन हे आरोप कधीही मान्य करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेची गुप्तहेर संघटना चीनच्या अंतराळ संशोधन संस्था, तेल कंपन्या, इंटरनेट कंपन्या आणि सरकार एजन्सींमध्ये गेल्या 11 वर्षांपासून ह्रकिंग करत असल्याचा आरोपही झाओ यांनी केला आहे. चीनच्या सायबर सिक्युरिटीचे रक्षण करण्यासाठी चीनकडून योग्य ती बावले उचलली जातील, असेही त्यानी म्हटले आहे.





