‘मराठीसारखं काम नाय करायचं’ म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला छाया कदमने सुनावले

Chhaya Kadam | अभिनेत्री छाया कदम हिने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. राज्यात एकीकडे हिंदी-मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच नुकतंच छाया कदमने मराठी इंडस्ट्रीत काम करताना हिंदी दिग्दर्शकाकडून आलेल्या अनुभवाचा किस्सा सांगितला.
छाया कदम यांनी हिंदीत काम करताना आलेला सेटवरचा अनुभव सांगितला की, ‘एका सिनेमाच्या सेटवर जो दिग्दर्शक होता तो दिल्लीचा होता. शूटिंगवेळी तो दोन-तीन वेळा माझ्यासमोर बोलत होता की, ‘यार वो मराठी जैसा काम नही करने का, अरे यार वो मराठी अॅक्टर जैसा नही करना है’. मग मला राग आला आणि माझ्यातली मालवणी, कबड्डी खेळणारी मुलगी जागी झाली.
माझ्यासमोर दुसऱ्या एका अभिनेत्रीलाही तो हेच सांगत होता. मी शेवटी शूटिंगच थांबवलं. मी विचारलं, ‘ये आप क्या बोल रहे हो? मला वाद घालायचा नाही. तू आधी माफी माग आणि तू जिला बोलतोयस ती मराठीतली मोठं नाव असलेली अभिनेत्री आहे. शेवटी मी शूट थांबवलं. दिग्दर्शकाने माफी मागितली आणि मग काम करायला सुरुवात झाली.” Chhaya Kadam |
छाया कदम ‘सैराट’,’फँड्री’ सारख्या सिनेमांमधील छोट्या पण दर्जेदार भूमिकांमधून पुढे आली. गेल्या वर्षी आलेल्या किरण रावच्या ‘लापता लेडीज’मधील भूमिकेने सर्वांचं मन जिंकलं. तिच्या ‘ऑल वी इमॅनज अॅज लाईट’ या सिनेमाचं स्क्रीनिंग कान्समध्ये झालं होतं. Chhaya Kadam |
हेही वाचा :
मोठा दिलासा ! PoP मूर्तींवरील बंदी उठली, समुद्रात विसर्जनाला हिरवा कंदील





