‘छावा’ चित्रपटाचा टीजर रिलीज; औरंगजेबाच्या भूमिकेतील ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला ओळखणे झाले कठीण

Chhaava Teaser | विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ चित्रपटाबाबत सर्वांच उत्सुकता लागली आहे. नुकताच याचा या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. विकी या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.
विकी कौशलचा जबरदस्त अंदाज आणि सिनेमाचं भव्यदिव्य रुप टीझरमध्ये बघायला मिळतो. हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. टीझरमध्ये संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल शेकडो योद्ध्यांना एकट्याने पराभूत करताना दिसत आहे.
View this post on Instagram
‘छावा’च्या टीझरमध्ये शेवटी औरंगजेबाची झलक पाहायला मिळते. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. ‘सिवा चला गया लेकिन अपनी सोच जिंदा छोड गया’, अशा डायलॉगमध्ये औरंगजेबाची झलक बघायला मिळते. मात्र या लुकमध्ये अक्षय खन्नाला ओळखणे देखील कठीण आहे.
लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’चं दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात रश्मिका मंदाना येसूबाईंची भूमिका साकारत आहे. दिव्या दत्ता, आशुतोष राणा हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या टीझरने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.

