Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश; ५१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
Chhattisgarh : आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये ३४ महिला नक्षलवाद्यांचा समावेश

Chhattisgarh : छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांतील ५१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या सर्वांवर सुमारे १ कोटी ६१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
या घटनेमुळे बस्तर विभागात शांततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असल्याचे मानले जात आहे. या आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये ३४ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, हे आत्मसमर्पण जगदलपूर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘बस्तर पंडुम २०२६’ महोत्सवाच्या उद्घाटनाच्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी रायपूरमध्ये आगमनाच्या दिवशीच झाले.
हेही वाचा:
Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपट ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री





