Imtiaz Jaleel : नेत्याच्या हातात नोटा, महिलांचा गराडा… इम्तियाज जलील यांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

Chhatrapati Sambhaji Nagar : एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि महायुतीकडून मतदारांना पैसा वाटण्यात आल्याचा आरोप केला आहे. पाचशे रुपये देऊन महिलांना महायुतीला मतदान करण्यात येत होतं, याबाबतचा व्हिडीओ देखील इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत दाखवला आहे.
अनेक ठिकाणी महिलांचे आधार कार्ड घेऊन त्यांना पैसे देण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मतांसाठी पैसे वाटतात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे. मी व्हिडीओ दाखवला, त्यातील लोक संविधान बदलण्याची भाषा करतात, त्यांच्यासाठी काम करतात, असा आरोपही जलील यांनी केला आहे.
A @BJP4India leader who came to distribute money at Ambedkar Nagar, a slum area in Aurangabad was surrounded by women for their 500 rupee note.! And all this as advance to cast their vote in favour of BJP minister Mr Atul Save. And these are visuals from just one area. What more… pic.twitter.com/hFfqL7lBUj
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) November 20, 2024
इम्तियाज जलिल म्हणाले, स्वत:ला नेता म्हणणारे दलित समाजातील लोक 500 रुपये वाटून संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपला मदत करत आहेत. यावेळी जलील यांनी अरविंद डोंगरगावकर हे भाजपच्या एका सेलचे नेते आहेत. त्यांचं ऑफिस जवाहर नगर पोलीस ठाण्यासमोर आहे. त्याठिकाणी मुस्लिम महिलांना रिक्षातून आणण्यात आलं. तिथं एका मतासाठी 1 हजार रुपये आणि जास्त लढत होते, त्यांना दोन हजार रुपये वाटण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे.





