छांगुर बाबाचे मोठे खुलासे ! “८ बँकांमध्ये खाते …अनेक महिलांसोबत संबंध…” ; अशा प्रकारे उभारले कोट्यवधींचे साम्राज्य

Chhangur Baba। उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर टोळीचा प्रमुख जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा आणि त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. रिमांडच्या पहिल्या दिवशी छांगुर आणि नीतू यांनी एटीएससमोर कबूल केले की, ते गेल्या १५ वर्षांपासून बेकायदेशीर धर्मांतरात सहभागी होते. छांगुर बाबाने अनेक देशांशी संबंध असल्याचेही कबूल केले आहे. हिंदू लोकसंख्या कमी करून तो देशाला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहत होता” असे धक्कादायक खुलासे त्याने केले आहेत.
छांगुर बाबा आणि नीतू यांनी एटीएसने केलेल्या चौकशीत सांगितले आहे की त्यांनी आठ वेगवेगळ्या बँकांमध्ये अनेक खाती उघडली होती. छांगुर बाबांचे बँक ऑफ बडोदासह अनेक बँकांमध्ये खाती होती. या खात्यांच्या चौकशीतून शंभर कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित सर्व माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छांगुर बाबाने अनेक देशांशी संबंध असल्याचेही कबूल केले आहे.
छांगुरची आठ बँकांमध्ये खाती Chhangur Baba।
छांगुरने नेपाळच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या होत्या. याशिवाय बनावट कागदपत्रांद्वारे अनेक वादग्रस्त जमिनी त्याच्या नावावर नोंदवण्यात आल्या होत्या. छांगुर लव्ह जिहादमध्ये सहभागी असलेल्या तरुणांना मोठी बक्षिसे देत असे. छांगुर बाबा त्या तरुणांना आलिशान हवेलीत लव्ह जिहादचे प्रशिक्षण देत असे. हिंदू लोकसंख्या कमी करून तो मुस्लिमांची संख्या वाढवू इच्छित होता. त्याचे स्वप्न भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे होते.’ अशी खळबळजनक माहिती चौकशीतून समोर आली आहे.
बलरामपूर येथील रहिवासी वसीउद्दीन चौधरी यांनी २०२३ मध्ये पंतप्रधानांना पत्र लिहून छांगुर बाबांच्या रॅकेट आणि नागपूरच्या भारत प्रतिकार्थ सेवा संघाच्या ईदुल इस्लाम आसी यांच्याबद्दल तक्रार करत चौकशीची मागणी केली होती. ईदुलने छांगुर बाबांना त्यांच्या संघटनेच्या भारत प्रतिकार्थ सेवा संघाचे उत्तर प्रदेश प्रमुख बनवले होते. यासाठी औपचारिक पत्र देखील जारी करण्यात आले होते. Chhangur Baba।
वासीउद्दीन हा नीतू उर्फ नसरीनची ती इमारत बांधणारा व्यक्ती आहे जी अलीकडेच प्रशासनाने जमीनदोस्त केली आहे. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता, त्यानंतर २०२३ मध्ये ही तक्रार करण्यात आली होती. या पत्रानंतर, छांगुर प्रकरणात पोलीस कारवाईत आले आणि संपूर्ण प्रकरण उघड झाले.





