छगन भुजबळ स्पष्टच बोलले, ‘शरद पवार अध्यक्षपदावर असले आणि नसले तरीही…’

मुंबई – शरद पवार अध्यक्षपदावर असले आणि नसले तरीही ते सूचना देतील त्यावर पक्ष चालणार आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही कमिटी आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. अद्याप या कमिटीची मिटिंग झालेली नाही. अगदीच नाईलाज झाला तर कमिटीची मिटिंग बोलावली जाईल आणि निर्णय घेतला जाईल” अस म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपल मत मांडलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण होईल, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहेत.
दरम्यान, शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार होतील की सुप्रिया सुळे याबाबत विचारलं असता, आज राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती आणि वाटचाल बघता अध्यक्षपदासाठी शरद पवारांसमोर अजित पवारांशिवाय दुसरं कोणतंही नाव असेल असं वाटत नाही, असे म्हणत अजित पवारांना राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्ष पदासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे.





