मुंबई – राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर या निर्णयावर विरोधीपक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत.
“पेट्रोल व डिझेलची दर कपात म्हणजे एखाद्याचे सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायची, असा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यांनी आज नाशिक येथील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, भाजपच्या केंद्रातील सरकारपेक्षा राज्यातील सरकार अधिक हुशार निघाले. एकीकडे जीएसटी 5 टक्क्यांनी वाढला, वीज बिल वाढलं, एलपीजी 50 तर सीएनजी 4 रुपयांनी महाग केलं आणि दुसरीकडे पेट्रोल केवळ 5 रुपयांनी आणि डिझेल 3 रुपयांनी कमी केले म्हणजे हे सरकार किती हुशार आहे यावरून कळते.
एखाद्याचे सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायची अशी पेट्रोल व डिझेलची दरकपात असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.