पुजारा सौराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी खेळणार होता, पण…
\n\n\nIt is a proud moment for me to have represented India for so many years. Many people have contributed to my journey: #CheteshwarPujara on his retirement from all forms of Indian cricket@cheteshwar1 pic.twitter.com/jnYN2EtbjK
\n— All India Radio News (@airnewsalerts) August 24, 2025
\nविशेष म्हणजे, पुजाराच्या या खुलाशातून असं दिसतं की, दुलीप ट्रॉफी 2025 साठी पश्चिम क्षेत्राच्या संघात त्याला स्थान न मिळाल्याचा परिणाम त्याच्या या निर्णयावर झाला असावा. यानंतर अशीही बातमी आली होती की, पुजारा सौराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी हंगाम खेळण्यासाठी उपलब्ध असेल, परंतु त्यापूर्वीच त्याने निवृत्ती जाहीर केली. यामागचं कारण स्पष्ट करताना पुजारा म्हणाला, “सुरुवातीला मी रणजी ट्रॉफी खेळण्याचा विचार करत होतो, पण नंतर मला वाटलं की, जर तरुण खेळाडूंना संधी मिळाली, तर ते लवकर तयार होतील. म्हणून हा माझा वैयक्तिक निर्णय होता.”पुजाराच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटच्या एका युगाचा अंत झाला असून, चाहत्यांना त्याच्या दीर्घ आणि प्रेरणादायी कारकिर्दीच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.