मोशीत केमिकल बॅरलचा स्फोट, आठ जण जखमी

Updated On:
मोशीत केमिकल बॅरलचा स्फोट, आठ जण जखमी

पिंपरी – केमिकलचा बॅरल स्वच्छ करीत असताना स्फोट होऊन आग लागली. या आगीत आठ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी मोशी येथे घडली.

मुसा मोहम्मद (वय 65, बारा टक्के भाजलेले), शिवराज बोईगवाड (वय 37, वीस टक्के भाजलेले) महादू पाडुळे (वय 45, पंचवीस टक्के भाजलेले), सुरेश बोईगवाड (वय 26 पंचवीस टक्के भाजलेले), पिराज बोईगवाड (वय 26 अठरा टक्के भाजलेले), मल्लू बोईगवाड (वय 45, पंधरा टक्के भाजलेले) माधव बोईगवाड (वय 28, वीस टक्के भाजलेले), बालाजी बोईगवाड (वय 38 तीस टक्के भाजलेले) अशी भाजल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

अग्निशामक दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मोशी येथील डी मार्ट समोर असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी विकिस नाईक यांनी दिली. तसेच काही जण अडकले असल्याचेही त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशामक केंद्रातील तसेच चिखली अग्निशामक उपकेंद्रातील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले.

केमिकलचे बॅरल स्वच्छ करत असताना हा स्फोट झाला. यातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या गोदामामध्ये ग्राउंड आणि पहिला मजला होता. केमिकलचे बॅरल स्वच्छ करण्याचे काम ग्राउंड फ्लोअरला चालत होते. तसेच पहिल्या मजल्यावर गोदामामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पाच खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक खोलीत पाच ते सहा जण राहतात. यामध्ये 18 ते 20 मोठी माणसे, आठ ते दहा ही पाच वर्षाखालील लहान मुले असल्याचे दिसून आले. तसेच गोदामामध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना केली नसल्याचेही दिसून आले. गोदामामध्ये अतिप्रमाणात केमिकलचे बॅरल ठेवण्यात आले होते. वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिना अतिशय अरुंद व जिन्यामध्ये केमिकलचे बॅरल असल्याचेही अग्निशामक दलाच्या पथकास दिसून आले.

आणखी संबंधित बातम्या

Adulterated Food: भेसळयुक्त अन्नाचा आरोग्याला धोका? रासायनिक मिश्रणांवर तज्ज्ञांचा इशारा; कडक तपासणीची मागणी

2026-10-07 07:48:00

Adulterated Food: भेसळयुक्त अन्नाचा आरोग्याला धोका? रासायनिक मिश्रणांवर तज्ज्ञांचा इशारा; कडक तपासणीची मागणी

Pakistan News : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात भीषण स्फोट; 11 ठार, 30 जखमी

2026-09-26 21:44:52

Pakistan News : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात भीषण स्फोट; 11 ठार, 30 जखमी

Moshi Garbage Depot : 'मोशी कचरा डेपोत आणखी सात गावांचा कचरा नको'

2026-09-17 09:12:12

Moshi Garbage Depot : 'मोशी कचरा डेपोत आणखी सात गावांचा कचरा नको'

Moshi accident : मोशी दुर्घटना, अंतरिम अहवाल शासनाकडे

2026-08-19 07:54:02

Moshi accident : मोशी दुर्घटना, अंतरिम अहवाल शासनाकडे

Traffic Jam : वाहनचालक रोज अडकताहेत कोंडीत

2026-07-29 08:20:59

Traffic Jam : वाहनचालक रोज अडकताहेत कोंडीत